माणुसकीला काळिमा! चक्क चोरटयांनी मंदिराच्या दानपेटीवरचं मारला डाव

60

भोसरी, दि. २६ (पीसीबी) – भोसरी येथील दुर्गामाता मंदिराच्या दानपेटीतून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 25) पहाटे पाच वाजता उघडकीस आली. कैलाशचन्‍द्र भैरुलाल शर्मा (वय 62, रा. दिघीरोड, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी रोड भोसरी येथे गंगोत्री पार्कमध्ये दुर्गामाता मंदिर आहे. शनिवारी रात्री नऊ ते रविवारी पहाटे पाच वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी मंदिराची दानपेटी फोडून त्यातून एक हजार 400 रुपयांची रक्कम चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare