माझ्या सांगण्यावरून ‘तो’ गव्हर्नर बडतर्फ; नितीन गडकरींचा गौप्यस्फोट

157

नागपूर, दि. १३ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. रिझर्व बँकेच्या एका गव्हर्नरला माझ्या सांगण्यावरून  तत्काळ बडतर्फ करण्यात  आले होते, असे गडकरी यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी त्या  गव्हर्नराचे नांव सांगितलेले नाही.   

गव्हर्नरला तात्काळ बडतर्फ करण्याची शिफारस मी तत्कालीन  अर्थमंत्री यांच्याकडे केली होती,  असा गौप्यस्फोट  गडकरी यांनी  नागपूरमध्ये बोलताना केला.  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किती अडेलतटू भूमिका घेतात तसेच त्यांच्या भूमिकेमुळे अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, हेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

हा गव्हर्नर चांगला नाही. त्याला बडतर्फ करा, अशी मागणी गडकरी यांनी केले सांगितले पण त्यांनी संबंधित गव्हर्नरचे नाव सांगितलेले नाही.

दरम्यान,  रालोआच्या पहिल्या कार्यकाळात अरूण जेटली आणि पीयूष गोयल हे अर्थमंत्री होते. त्या काळात रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदाची जबाबदारी रघुराम राजन आणि उर्जित पटेल  यांच्याकडे होती. या दोघांपैकी गडकरी यांनी  कोणाला बडतर्फ करण्यास सांगितले यांचा  उल्लेख केलेला नाही.