माझ्या बॉयफ्रेण्डला ‘तिच्या’सोबत रंगेहाथ पकडले होते- दीपिका पदुकोण

367

मुंबई, दि. २५ (पीसीबी) –  बॉलिवूडचे हिट आणि हॉट कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग येत्या नोव्हेंबर महिन्यात विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. त्याचवेळी दीपिका आणि एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूर यांच्या गुप्त भेटी होत असल्याचंही काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे. दीपिका-रणबीर पॅचअप करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दीपिकाने दिलेली एक मुलाखत या मीडिया रिपोर्ट्सना सणसणीत उत्तर ठरत आहे.

साधारण ११ वर्षांपूर्वी म्हणजेच २००७ मध्ये रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांची भेट झाली होती. २००८ साली ‘बचना ऐ हसिनो’च्या सेटवर दोघांमध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र एके दिवशी दीपिकाने बॉयफ्रेण्डला एका तरुणीसोबत रंगेहाथ पकडले् आणि नात्याची घडी विस्कटली.

ब्रेकअपनंतर काही महिन्यांनी एका आघाडीच्या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती. रणबीरचे नाव घेणे दीपिकाने टाळले असले, तरी हे ओपन सिक्रेट आहे.

‘माझ्यासाठी सेक्स म्हणजे केवळ दोन शरीरांचे मीलन नाही. त्यामध्ये भावनाही गुंतलेल्या असतात. रिलेशनशीपमध्ये असताना मी कधीही कोणाची फसवणूक केली नाही. जर मला चीट करायचे असेल, तर रिलेशनशीपमध्ये कशाला अडकावे? त्यापेक्षा सिंगल राहून मजा करावी. पण प्रत्येक जण हा विचार करत नाही. म्हणूनच कदाचित मी जास्त दुखावले गेले. त्याने गयावया केली, तेव्हा त्याला दुसरी संधी देण्याचा मूर्खपणा मी केला. माझे मित्र मला सांगत होते, की तू तुला फसवतोय. पण एके दिवशी मी त्याला रंगेहाथ पकडले. मला यातून बाहेर पडायला वेळ लागला. परतीचे मार्ग बंद होते.’ असे दीपिका म्हणाली होती.