माझ्या टेबलावर फाईल असती, तर कधीच मराठा आरक्षण दिले असते – पंकजा मुंडे  

309

बीड, दि. २६ (पीसीबी) – माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते, असे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी आज (गुरूवार)  बीडमधील परळीत ठिय्या आंदोलन करणाऱ्या मराठा मोर्चेकऱ्यांची भेट घेतली.

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आले आहे. मी तुम्हाला वाकायला सांगणार नाही. मी तुमची दूत बनणार आहे. तुमच्यासाठी मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांपर्यंत जाणार आहे. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते की जर माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती, तर मी क्षणाचा विलंब न करता आरक्षण दिले असते.

आज मी तुम्हाला एक शपथ देण्यासाठी आले आहे. जीव गमावू नका. माझ्या वाघांनो जीव देऊ नका..जीव घ्या, आमचा जीव घ्या. आरक्षणासंदर्भात अधिवेशन घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मागणी करणार असल्याचे पंकजा यांनी यावेळी सांगितले.