माझ्या आमदारकीवर मी लाथ मारेल…पण मी पवारसाहेबांसोबतच राहिल – अनिल पाटील

180

मुंबई,दि.२५(पीसीबी) – मी माझी आमदारकीदेखील पणाला लावायला तयार आहे. अजित पवार यांनी व्हीप बजावला तरी मी शरद पवारसाहेबांसोबतच राहणार… मग माझी आमदारकी गेली तरी चालेल., असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीच्या गटनेत्याने आम्हाला बोलावलं… आम्ही पक्षाच्या नेत्याने बोलावलं म्हणून गेलो… आम्हाला वाटलं पक्षाची बैठक आहे… मात्र तसं काही घडलं नाही… आता जे झालं ते झालं, मी पवारसाहेबांसोबतच राहिल, असं ते म्हणाले आहेत.

अनिल पाटील हे अजित पवार यांच्या शपथविधीला राजभवनावर गेले होते. त्यानंतर अनिल पाटील हे दोन दिवस गायब होते. मात्र ते आता मुंबईत परतले आहेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

WhatsAppShare