‘माझ्यावर प्रेम कर’ म्हणणाऱ्या तरुणास महिलेचा नकार; महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी तरुणाला अटक

133

चिंचवडगाव, दि. २२ (पीसीबी) – ‘माझ्यावर प्रेम कर’ असे म्हणाऱ्या तरुणास नकार दिल्याने तरुणाने महिलेला शिव्या दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही घटना चिंचवडमधील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ मार्च 2019 ते 21 जून 2021या कालावधीत घडली.

अण्णा ऊर्फ निशांत शंकर साळवे (वय 37, रा. आकुर्डीगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने सोमवारी (दि. 21) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी साळवे याने पिडित महिलेला ‘माझ्यावर प्रेम कर, माझ्याशी शाररिक संबंध ठेव’, असे मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे शब्द वारंवार बोलला. तसेच मोबाइलवर वारंवार मेसेज पाठवून पाठलागही केला. फिर्यादी पिडीत महिलेने त्यास दाद दिली नाही. त्यामुळे आरोपीने तिला शिव्या देऊन धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare