“माझे पहिले प्रेम योगगुरु रामदेवच” – राखी सावंत

288

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड ड्रामा क्विन राखी सावंत सध्या तिच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने एका विदेशी व्यक्तिसोबत लग्न केले, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. खरं तर राखीने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न केल्याचा खुलासा केला. मात्र, याआधीही तिने अनेकदा पत्रकार परिषद घेऊन लग्नाबाबत खुलासे केले आहेत. परंतु ते सर्व खुलासे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी होते असे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर राखीच्या या नव्या जोडीदाराबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

या लग्नाआधी राखीने योगगुरू रामदेव बाबा यांना देखील लग्नाची मागणी घातली होती. एका मुलाखती दरम्यान तिने रामदेव यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “माझे रामदेव यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, हे माझे पहिले प्रेम आहे. जर त्यांनी माझ्या प्रेमाचा स्वीकार केला तर मी त्यांच्याबरोबर लग्न करायला तयार आहे.” असे म्हणत राखीने रामदेव यांना लग्नाची मागणी घातली होती. परंतु रामदेव यांनी राखीला नकार दिला होता. “मी राखीला एका कार्यक्रमात भेटलो होतो. तेव्हा पासून ती माझ्या मागे लागली आहे. मला सतत ती लग्नाबद्दल विचारत आहे. परंतु देशात लग्न न झालेली अनेक मुले आहेत. तु त्यांचा विचार कर.” असे म्हणत त्यावेळी रामदेव यांनी राखीच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला होता.

त्याआधी राखी सोशल मीडिया फेम दिपक कलालबरोबर लग्न करणार होती. दोघांनी चक्क पत्रकार परिषद घेऊन लग्नाबाबत घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेची सोशल मीडियावर तुफान खिल्ली उडवण्यात आली. त्यानंतर काही अंतर्गत मतभेदांमुळे राखीने दिपकबरोबर लग्न करण्यास नकार दिला होता.

WhatsAppShare