माझा पक्ष सहभागी न झाल्यानेच बंद अपयशी – रामदास आठवले

0
390

मुंबई,दि.२४(पीसीबी) – भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांनी “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुकारलेला बंद मध्ये माझा पक्ष सहभागी न झाल्यानेच अपयशी झाला” असा दावा केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

“आजचा (24 जानेवारी) बंद अनावश्यक होता. भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी होता. आजच्या बंदला अपवादात्मक ठिकाणी प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 99.99 टक्के ठिकाणी बंद नाही, सर्व सुरु आहे. या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी नाही म्हणूनच प्रकाश आंबेडकरांचा बंद फेल ठरला.” असं रामदास आठवले यावेळी म्हणाले आहेत.

तसेच भीमा कोरेगाव घटनेनंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये माझा पक्ष सहभागी असल्याचीही आठवण करुन दिली. ते मुंबईत बोलत होते.