माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं असं भाजपचं राजकारण आहे – संजय राऊत

113

मुंबई,दि.१५(पीसीबी) – मला खात्री होती भाजपवाले दिलेला शब्द पाळणार नाही याची. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावरच हे मला कळलं होतं. माझं ते माझं तुझं ते माझ्या बापाचं आहे असं भाजपचं राजकारण सुरु आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

लोकमत आयोजित पुरस्कार कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी दिलखुलास बातचीत केली. माणूस मृत्यूला किंवा तुरुंगात जायला घाबरतो. पण मी कशालाही घाबरत नाही. त्यामुळे कुणालाही घाबरण्याचा प्रश्नच येत नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

पक्षाला शिवसेना नाव ठेवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारणा केली होती का?, अशी टीका माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. यासंदर्भात प्रश्न विचारले असता त्यांनी उदयनराजेंवर पलटवार केला आहे. उदयनराजेंनी शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे, असं त्यांनी म्हटलं आहे.