माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचे निधन

151

कोलकाता, दि. १३ (पीसीबी) – लोकसभेचे माजी सभापती व माकपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ चॅटर्जी यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी किडणीतील संक्रमणामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रविवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती. परंतु, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणजोत मालवली.

चॅटर्जी यांचे स्वास्थ्य गेल्या काही महिन्यांपासून ठीक नव्हते. जुलैमध्ये देखील त्यांना हेमोरेजिक स्ट्रोकनंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्यांच्यावर ४० दिवस ओपचार सुरू होते.६ ऑगस्टला त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.