माजी महापौर योगेश बहल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; लक्ष्मण जगताप, सीमा सावळेंनी दिल्या शुभेच्छा

257

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा वाढदिवस शनिवारी (दि. १४) उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे आणि भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी बहल यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

माजी महापौर आणि माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल हे शहरातील अभ्यासू राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. आमदार अजितदादा पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. ते महापालिकेत सलग सहाव्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत त्यांना अनेक महत्त्वाच्या पदांची जाबाबदारी दिली आहे.

महापालिकेत सत्तेत असताना महापौर तसेच पक्षाचे शहराध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. महापालिकेतील सत्ता गेल्यानंतर राष्ट्रवादीने योगेश बहल यांच्याकडेच विरोधी पक्षनेतेपद दिले. या पदावरून ते नुकतेच पायउतार झाले आहेत. त्यांचा शनिवारी उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. स्वपक्ष असलेल्या राष्ट्रवादीसोबतच विरोधी पक्षाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी बहल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप तसेच स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांनीही बहल यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बहल हे राजकारणापलीकडे मैत्री जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे मित्र आहेत. या सर्वांनी त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.