माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया विरोधात मानहाणीचा खटला केला दाखल

64

जळगाव, दि. २२ (पीसीबी) – अंजली दमानिया यांनी टि्वरच्या माध्यमातून न्यायालय तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांची बदनामी केली. याप्रकरणी खडसे यांनी आज (शुक्रवार) जळगाव जिल्हा न्यायालयात अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

जिल्हा न्यायालयात आज अंजली दमानिया यांच्याविरोधात मानहाणीचा फौजदारी खटला दाखल करण्यासाठी एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता कार्यकर्त्यांसह आले होते. दमानिया यांनी ‘टि्वटर’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या मजकुरातून उच्च न्यायालय आणि खडसेंची बदनामी केली. याबाबत भा. दं. सं. कलम ५०० नुसार मानहाणीचा फौजदारी दावा खडसेंनी न्यायालयात आज सादर केला.