माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या जीवनावर वेब सीरिज

57

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – मुंबईचे माजी पोलिस कमिशनर राकेश मारिया यांच्या आयुष्यावर ‘फँटम फिल्म्स’ आणि ‘राजी’ चित्रपटाच्‍या दिग्‍दर्शिका मेघना गुलजार हे वेब सीरिज आणणार आहेत. मारिया यांचे जीवन आणि त्यांनी सोडवलेल्या पोलिस केस यांवर आधारित ही वेब सीरिज असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या वेब सीरिजमध्ये २६/११ चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, शीना बोरा हत्या, नीरज ग्रोव्हर हत्या, १९९३चे बॉम्बस्फोट असे अनेक विषय दाखवले जाणार आहेत. या वेबसीरिजमध्‍ये कोण-कोण कलाकार असणार या बाबत खूलासा झालेला नाही. मात्र  मेघना यांच्या दिग्‍दर्शनाखाली बनणार्‍या या सीरिजमध्‍ये मारिया यांचे अनुभव आणि त्‍यांनी सोडवलेली गुन्‍हेगारी प्रकरणे दाखवली जाणार आहेत.