माजी पंतप्रधान  अटलबिहारी वाजपेयी  यांचे निधन   

59

नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी (वय. ९३) यांचे  आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी निधन झाले. वाजपेयी  यांच्यावर  ११ जूनपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या किडनीला संसर्ग झाला होता. अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.   वाजपेयींच्या निधनामुळे अवघा देश हळहळ व्यक्त करत आहे. त्यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील तारा ढगाआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.