माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
482

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आज (मंगळवार) मुंबईमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे खासदार कुमार केतकर, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी आज भिवंडी येथील न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर गोरेगावमध्ये आयोजित काँग्रेसच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

अभय ठिपसे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत. काही दिवसापूर्वीच त्यांनी सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक खटल्यात अनियमितता दिसत असून आरोपमुक्त करण्यात आलेल्या आरोपींवर फेरविचार करायला हवा, असे म्हटले होते.

सध्याच्या वातावरणात देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. धर्मनिरपेक्ष पक्षाची ओळख असलेल्या काँग्रेसमधून परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे ठिपसे यांनी काँग्रेस प्रवेशानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.