माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडे यांचे निधन

74

पिंपरी, दि. 30 (पीसीबी): वारकरी संप्रदायातील जेष्ठ वारकरी आणि माजी नगरसेवक हभप विठोबा सोनबा लांडे यांचे वृद्धापकाळाने आज (दि. ३०) निधन झाले. त्यांचे वय 102 होते. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विलास लांडे यांचे ते  वडील होत.

विठोबा लांडे यांचे वारकरी संप्रदायात मोठे कार्य होते. 1979 मध्ये पिंपरी चिंचवड नगरपालिका असताना ते नगरसेवक देखील होते. भोसरी पंचक्रोशीतील ते जुन्या पिढीतील कार्यकर्ते होते. भोसरीतील राहत्या घरी आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

दरम्यान गेल्याच महिन्यात 6 मे रोजी विठोबा लांडे यांच्या पत्नी इंदूबाई यांचे निधन झाले होते. त्यांनतर महिनाभरात विठोबा लांडे यांचे निधन झाले आहे. लांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

त्यांच्या मागे मुलगा माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, तीन मुली, सून माजी महापौर मोहिनी लांडे, नातू विद्यमान नगरसेवक विक्रांत लांडे तसेच सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.

WhatsAppShare