माजी नगरसेवकाने ब्युटी पार्लरमध्ये घुसून केली महिलेला अमानुष मारहाण; व्हिडिओ व्हायरल

1220

तामिळनाडू, दि. १३ (पीसीबी) – द्रमुकच्या माजी नगरसेवकाने ब्युटी पार्लरमध्ये घुसून एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. ही घटना  २५ मे २०१८ रोजी  तामिळनाडूच्या पेरामबालूरमधल्या ब्युटी पार्लरमध्ये घडली होती.

याप्रकरणी द्रमुक पक्षाचा माजी नगरसेवक सेल्वाकुमार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सेल्वाकुमार अत्यंत भयानक पद्धतीने महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, द्रुमक पक्षाचा माजी नगरसेवक सेल्वाकुमार याने २५ मे रोजी  तामिळनाडूच्या पेरामबालूरमधल्या ब्युटी पार्लरमध्ये घुसून एका महिलेला लाथा-बुक्क्यांनी अमानुष मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोसळ मिडीयावर व्हायरल झाला असून द्रमुक पक्षाने त्याची हकालपट्टी केली आहे. सेल्वाकुमार महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना तिथे उपस्थित असलेल्या अन्य तीन महिला त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र सेल्वाकुमार कोणाचेही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो अमानुषपणे त्या महिलेवर लाथांचे प्रहार करत होता. त्याने या महिलेला का मारहाण केली ? त्या महिलेचा सेल्वाकुमारशी काय संबंध आहे? यासंबंधी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. पोलिस सेल्वाकुमारची चौकशी करत आहेत.