माजी क्रिकेट खेळाडूंचे लग्नानंतरही पाच ते सहा अफेयर

225

मुंबई, दि, १८ (पीसीबी) – पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाक यांनी एका मुलाखाती दरम्यान प्रेमसंबंधाविषयी प्रश्न विचारल्यास त्याने जाहिररीत्या सांगितले की, लग्नानंतर ही माझे पाच ते सहा अफेयर असल्याचे सांगितले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच रझ्झाकने एक अजब मागणी केली होती. हार्दिक पांड्याची फलंदाजी व गोलंदाजी उत्तम असताना पाकिस्तानी संघातील माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाक यांनी पंड्याच्या खेळात अनेक त्रुटी असल्याचे सांगितले. व पंड्याला फक्त दोन आठवडे माझ्याकडे पाठवा. त्याला जगातला सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू बनवतो असे म्हटले होते.