मागील सरकारच्या काळातील ‘या’ घोटाळ्यांची माहिती काढणार

47

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – भाजप नेत्यांनी आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे काढण्यास सुरुवात केल्याने आघाडी सरकारचे अनेक मंत्री अडचणीत आले आहेत. त्यामुळे आता आघाडी सरकारनेही भाजप विरोधात वात पेटवण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी बंद दाराआड झालेल्या खास बैठकीत भाजपला जशास तसं उत्तर देण्याचं ठरल्याचं बोललं जात आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढून ही विशेष बैठक झाल्याची माहिती आहे. सरकारची प्रतिमा मलीन करून जनतेच्या मनात संभ्रम तयार करण्याचे हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजे, याबाबत प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री या बैठकीत आक्रमक झाले होते, असं समजतंय.मागील सरकारच्या काळातील अशा घोटाळ्यांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी महाआघाडीमधील तीन पक्षांच्या तीन मंत्र्यांकडे देण्यात आली आहे. त्यांना ज्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल, त्याची पूर्तता संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आल्याचे काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितलं आहे.

WhatsAppShare