मागास जाती प्रवाहात येईपर्यंत आर्थिक निकषांवर नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये आरक्षण नको- अशोक चव्हाण

93

मुंबई, दि.२७ (पीसीबी) – मागासलेल्या जाती जोपर्यंत मुख्य प्रवाहात येत नाहीत, तोपर्यंत आर्थिक निकषांवर नोकऱ्या आणि शिक्षणांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घेणे योग्य होणार नाही, असे ठाम मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.