मागास जातीचा असल्यामुळे काँग्रेसने मला शिव्या देत आहे – पंतप्रधान मोदी

133

सोलापूर, दि. १७ (पीसीबी) –  मी मागास जातीचा असल्यामुळे काँग्रेसने मला शिव्या देत आहे, असा घणाघात पंतप्रधान  मोदी यांनी  आज (बुधवार) येथे केला. तसेच संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणायला लागले आहेत, असेही मोदी म्हणाले.सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघातील अकलूजमध्ये मोदी यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.  

यावेळी मोदी म्हणाले की,   काँग्रेसच्या नेत्यांनी माझी लायकी दाखवणाऱ्या, माझी जात सांगणाऱ्या शिव्या देण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही.   आता तर  संपूर्ण मागास समाजाला चोर म्हणायला लागले आहेत. अरे मला शिव्या द्या, मी अनेक वर्षांपासून सहन करत आलो आहे आणि करेन. पण चौकीदार, मागास वर्ग असो, दलित, पीडित, शोषित, आदिवासी असो, जर कोणालाही अपमानित करण्यासाठी तुम्ही चोर म्हणण्याची हिंमत केली, तर मोदी सहन करणार नाही, हा देश सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी काँग्रेसला दिला.

नामदारांनी पहिल्यांदा चौकीदारांना चोर म्हटले. जेव्हा सगळे चौकीदार मैदानात आले, प्रत्येक भारतीय चौकीदार बोलू लागला तेव्हा यांच्या तोंडाला कुलूप लागले आहे. ते आता तोंड लपवत फिरत आहेत, अशी टीकाही मोदी यांनी काँग्रेसवर केली.