मागण्या मान्य न झाल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो ; महामुंबई मराठा समाज मोर्चाचा इशारा  

42

मुंबई, दि. २८ (पीसीबी) – मराठा आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत. लाठीचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी. तसेच मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाची माफी मागावी, या मागण्या येत्या दोन दिवसांत मान्य न केल्यास १ ऑगस्टपासून जेलभरो आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा महामुंबई मराठा समाज मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.