माओवाद्याकडून राजीव गांधी हत्येचा कट; नरेंद्र मोदी निशाण्यावर

83

पुणे, दि. ८ (पीसीबी) – माओवाद्यांकडून राजीव गांधी हत्याकांडासारखे घातक कृत्य करण्याचा प्रयत्न होता, असे सरकारी वकिल उज्ज्वला पवार यांनी पुणे सत्र न्यायालयात सांगितले. त्यामुळे माओवाद्यांच्या निशाण्यावर नरेंद्र मोदीच तर नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना नुकत्याच बेड्या ठोकल्या आहेत. तपासादरम्यान पोलिसांना याबाबत एक पत्र मिळाले असल्याचा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.

चार लाख राऊंड फायर करण्याची क्षमता असलेले एम ४ हे शस्त्र खरेदी करण्याचा प्लान असल्याचा धक्कादायक उल्लेख या पत्रात आहे. यासाठी आठ कोटी रुपये देण्याची तयारीही दर्शवल्याची माहिती आहे.

सरकार खोटी कागदपत्रे तयार करुन एल्गार परिषदेच्या आयोजकांना यात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी केला आहे.