महेशनगरमध्ये घरातल्यांना गुंगीचे औषध देऊन नेपाळी दाम्पत्याने पळवला सव्वातीन लाखांचा ऐवज

144

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – घरकाम करण्यासाठी ठेवलेय नेपाळी दाम्पत्याने घरमालक पतिपत्नी आणि त्यांच्या मुलाला जेवणातून बेशुद्धीचं औषध देऊन दिवसाढवळ्या घरातल्या कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि काही रोख रक्कम घेऊन पळ काढला. ही घटना मंगळवार दि.११ दुपारी एक ते दीडच्या दरम्यान पिंपरी माहेशनगर अॅटलास कॉलनी येथील समीर बंगल्यात घडली.

काशीनाथ नेरकर वय ६४, सुमन नेरकर वय ६१ आणि त्यांचा मुलगा दीपक नेरकर असा बेशुद्धीच्या औषधाचा उपयोग करण्यात आलेल्या तिघा माय लेकरांची नावे आहेत.या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात २१ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेरकर कुटुंब हे माहेशनगर अॅटलास कॉलनी येथील समीर बंगल्यात राहतात. २७ मे रोजी त्यांनी घरकामासाठी एक नेपाळी दाम्पत्य ठेवले होते. मंगळवारी या दाम्पत्याने काशीनाथ नेरकर वय ६४, सुमन नेरकर वय ६१ आणि त्यांचा मुलगा दीपक नेरकर या तिघांना जेवणातून बेशुद्धीचं औषध दिले. यामुळे तिघेही बेशुद्ध झाले. आणि त्या नेपाळी दाम्पत्याने डाव साधून घरातल्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने आणि रोख असा ३ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास केला.  दुपारी काशीनाथ यांची २१  वर्षीय  नात घरी आल्यावर त्यांनी आजी सुमन यांना आवाज दिला. मात्र कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने. त्या देखील त्यांच्या खोलीत झोपी गेल्या. सायंकाळी नातीने पुन्हा आजी सुमन आणि आजोबा काशीनाथ यांना आवाज दिला मात्र कोणी प्रतिसाद देत नसल्याने मुलींनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व बेशुद्ध अवस्थेत होते. तसेच घरातील समान आणि कपाटातील समान अस्ताव्यस्त होते. यावर नातीने जवळची संत तुकाराम नगर पोलीस चौकी गाठली. सध्या नेरकर कुटुंबावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी नेपाळी दाम्पत्याची पूर्ण माहिती नेरकर यांच्याकडे नसल्याने त्यांची ओळख पटणे अवघड झाले आहे. दरम्यान नेरकरांचा एक मुलगा लष्करात होता त्याला काही वर्षांपूर्वी वीर मरण आले होते. पिंपरी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.