महिलेस धमकावून बलात्कार; चिंचवड येथील घटना

604

चिंचवड दि.८ (पीसीबी) -एका व्यक्तीने महिलेला धमकावून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना 20 एप्रिल आणि 2 मे रोजी चिंचवड येथे घडली.

मंदार काळुराम कंधार असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंडओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी महिलेला धमकावून जबरदस्तीने त्यांच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. याबाबत पीडित महिलेने शनिवारी (दि. 7) चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.