महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्या प्रकरणी पिंपरीतील आरपीआय उद्योग सेलच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल

0
809

भोसरी, दि. १३ (पीसीबी) – कार सर्व्हिसिंगच्या बहाण्याने शोरूममध्ये जाऊन महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटाच्या) उद्योग सेल अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित मेश्राम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पिडीत ३७ वर्षीय महिलेने याबाबत भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित मेश्राम यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार ८ मे ते ३० मे २०१८ दरम्यान आरोपी अमित मेश्राम हा आपली कार सर्व्हिसिंग करण्याच्या बहाण्याने भोसरी एमआयडीसी येथील टोयोटा शोरुमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने तेथील एका ३७ वर्षीय महिला कर्मचाऱ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेचा विनयभंग केला. याबाबतची तक्रार पिडीतेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अमित मेश्राम यांच्यावर विनय भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.