महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या; मोदी योगा करण्यात मश्गुल – राहुल गांधी

63

नवी दिल्ली, दि. २६ (पीसीबी) – अफगाणिस्तान, सीरिया, सौदी अरेबिया या देशांपेक्षाही भारतात बलात्कार, महिलांवरचे अत्याचार, लैंगिक छळ यांच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे योगासने करण्यातच मश्गुल आहेत. महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्याच्याशी पंतप्रधानांना काहीही सोयरसुतक नाही. देशासाठी ही  लाजीरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला.  

भारत हा महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वाधिक धोकादायक देश आहे, असा अहवाल थॉमसन रॉयटर्स फाऊंडेशनने प्रaसिध्द केला आहे. भारतात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर  अत्याचार वाढले आहेत, असे या अहवालात म्हटले आहे. धोकादायक देशांच्या यादीत  भारताचा पहिला क्रमांक आहे. तर अफगाणिस्तान आणि सीरियाला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक दिला आहे. याच अहवालाच्या आधारे राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर आसूड ओढले आहेत.

दरम्यान, मोदी यांनी आणीबाणीचा दाखला देत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कशी आणीबाणी लादली होती, याबाबत माहिती देऊन गायक किशोरकुमार यांनाही काँग्रेसने कशा पध्दतीने त्रास दिला, हे सांगितले. काँग्रेसने कायम दलित आणि मुस्लिमांमध्ये भय पसरवण्याचे काम केले अशीही टीका केली होती.