महिलांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या `त्या` पत्रकारावर गुन्हा दाखल कऱण्याचे महापौर माई ढोरे यांचे आदेश – जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांच्या मागणीला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा

266

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – महिला नगरसेविकांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषेत घृनास्पद लिखाण करणाऱ्या पत्रकार भीमराव पवार याच्यावर गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश महापौर माई ढोरे यांनी आज महापालिका सर्वसाधारण सभेत दिले. जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी उपस्थित केलेल्या या विषयावर सर्व पक्षीय महिला तसेच पुरुष नगरसेवकांनीही उभे राहुन आपला पाठिंबा दर्शविला. महापालिका सभेत या विषयावरुन वादळी चर्चा झाली. अशा प्रकारचे लिखाण करणाऱ्या त्या पत्रकाराचा निषेध करण्यात आला.

जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी स्मार्ट सिटी मधील भ्रष्ट कारभाराबद्दल आजच्या महापालिका सभेत तुफानी भाषण केले आणि पुराव्यांसह काही मोठी प्रकरणे बाहेर काढली. त्यामुळे पित्त खवळलेल्या भाजपा आमदाराने पोसलेल्या पत्रकार भीमराव पवार याने तासाभरात सिमा सावळे यांच्या बद्दल पिंपरी चिंचवड टाईम्स मधून अत्यंत खालच्या भाषेत लिखाण केले. `नगरसेविका सिमा सावळे महापालिका सभेत भुंकल्या`, अशा शब्दांत त्या पत्रकाराने सावळे यांची संभावना केली आणि एकेरी भाषेत आक्षेपार्ह पध्दतीने त्यांचे चारित्रहनन केले. त्या लिखाणाचा उल्लेख करत सिमा सावळे यांनी हा माझा विनंयभंग आहे, तमाम महिला वर्गाचा अपमान आहे, असे म्हणत गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली.

आक्रमक झालेल्या सिमा सावळे म्हणाल्या, सुपारी घेऊन माझे चरित्रहनन कऱणाऱ्यांचा पोशिंदा कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. हा तमाम महिला वर्गाचा अपमान आहे. अशा पत्रकाराला पालिलेकत बंदी घातली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हशी, टोणगे, कुत्रे अशा शब्दांत नगरसेवकांचा उल्लेख केला जातो, ही कुठली पत्रकारिता आहे, असा सवाल उपस्थित करत सिमा सावळे यांनी अशा प्रवृत्ती विरोधात महापालिकेने त्वरीत गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी लावून धरली.

सिमा सावळे यांच्या मागणीला बहुतांश नगरसेवकांनी पाठिंबा देत कारवाईची मागणी रेटून धरली. अखेर महापौर माई ढोरे यांनी त्याबाबत आपले मत व्यक्त करताना, अशा प्रकारे महिलांबद्दल आक्षेपार्ह लिहिनाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत निषेधही नोंदविला.

स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचारात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विनापरवाना स्मार्ट सिटीत ठेकेदारी देणाऱ्या भाजपने स्मार्ट घोटाळा केला असा आरोप माजी महापौर योगेश बहल म्हणाले. यावर महापौर माई ढोरे यांनी भाजप पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे मोठा पक्ष आहे. याठिकाणी स्मार्ट सिटीमधील भ्रष्ट्राचारामध्ये पक्षाचे नाव घेवू नका असे सुनावल्यानंतर बहल यांनी जेवढा पक्ष मोठा तेवढा स्मार्ट सिटीत भ्रष्ट्राचार ही मोठाच झाला आहे असे सत्ताधारी भाजपचे कान टोचले.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. त्याची आचारसंहिता डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे आज होणाऱ्या ऑफलाईन सभा धरून केवळ तीन सर्वसाधारण सभा होतील. महापालिकेच्या होत असलेल्या आजच्या ऑफलाइन सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी, आरोग्य विभाग, पर्यावरण विभाग, प्रशासनातील ढिसाळ कारभारामुळे सभागृहात जोरदार राडा पाहावयास मिळत होता.

भाजप नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, “स्मार्ट सिटीच्या कामांमधील भ्रष्टाचाराबाबत मी गेल्या एक वर्षापासून आयुक्तांकडे तक्रार करत होतो. मी त्याच्यासोबत भेटीची मागणी केली होती. मला सुनावणी करता वेळ मिळवण्यासाठी वेळ देत नाहीत. प्रत्येक नगरसेवकाला आयुक्तांची समस्या असते. तो सभ्य नाही आणि नागरिक आणि नगरसेवकांनी केलेल्या तक्रारी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मला माहित नाही की त्याच्यात काय चूक आहे. लोकांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल करणे आणि नागरिकांच्या गैरसोयीचा निषेध केल्याबद्दल त्यांना अटक करणे ही पिंपरी-चिंचवडच्या इतिहासातील आयुक्तांची पहिली कारवाई आहे. अशा शब्दात सावळे यांनी आशा शेंडगे यांच्यावरील कारवाई बाबत नाराजी व्यक्त करत आहेत.

WhatsAppShare