महिलांच्या आयपीएल चॅलेंजर स्पर्धेत व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या श्रद्धा पोखरकरची निवड

70

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या श्रद्धा पोखरकरची प्रथमच होणाऱ्या यंदाच्या महिलांच्या आयपीएल चॅलेंजर स्पर्धेत ट्रेलब्लेझर संघात निवड झाली आहे.

गेली ५ वर्षे व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीमध्ये क्रिकेटचे धडे गिरवतेय. जुन्नर मधल्या खेडे गावातून आलेले हे राॅ टॅलेन्ट तिचे क्रिकेट सिझन बाॅलने पहील्यांदाच अकॅडमीमध्ये सुरू झाले. डाव्या हातानी मध्यम गतीने गोलंदाजी करायची आवड होती. Out swing बरोबर Sharp in Swing ची कला लवकरच शिकली U23 नंतर महाराष्ट्र सिनियर टिम मधे सातत्याने योगदान देतेय. Hard Work आणी सतत शिकण्याच्या गुणामुळे अकॅडमी सोबत महाराष्ट्राचे नाव करतेय.

मुलांच्या क्रिकेटबरोबरच मुलींचे क्रिकेटही येथे वाढविण्याच्या दृष्टीने अकॅडमीचे संचालक व भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर ह्यांच्या धोरणामुळे महिलांच्या क्रिकेटला तितकेच महत्व देत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे भावी काळात राष्ट्रीय संघात येथील महिला खेलाडू दिसणार आहेत,,