महावितरणाला विक्रमी ३० हजार कोटींचा तोटा, ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार

50

लातुर, दि.११ (पीसीबी) – तुमचे वीज बिल आजवर हजार रुपये येत असेल, तर ते आता १ हजार ३५० रुपये येणार आहे. कारण तुम्हाला वीज पुरवणाऱ्या महावितरणला तब्बल ३० हजार ८४२ कोटींचा तोटा झाला आहे. आणि हाच तोटा पुन्हा ग्राहकांकडूनच भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.
गेल्या दीड वर्षात महावितरण कंपनीला तब्बल ३० हजार ८४२ कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.
महावितरणने घरगुती वापरासाठी ५ टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी ३५ टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.