महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगाल यांच्या आत्महत्ये प्रकरणी नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्हाणेंना अटक

40

नांदेड, दि. १२ (पीसीबी) – महावितरणचे कंत्राटदार सुमोहन कनगाला यांच्या आत्महत्येप्रकरणी नांदेड चेंबर्स ऑफ कॉमर्सचे सचिव चंद्रकांत गव्हाणे यांना अटक करण्यात आली आहे. सुमोहन कनगाला यांनी गुरुवारी (दि.११) गोळी झाडत आत्महत्या केली होती. सुमोहन कनगाला यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये काही उद्योजक आपल्याला त्रास देत असल्याचा उल्लेख केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमोहन कनगाला यांनी चंद्रकांत गव्हाणे आणि आणखी तिघांसह एका कंपनीची स्थापना केली होती. पंरतु चंद्रकांत गव्हाणे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत कनगाला यांचे शेअर्स कमी दाखवले. त्यानंतर गव्हाणे ८० लाख रुपयांसाठी तर ओरिसातील आणखी एक पार्टनर १ कोटी २० लाखांसाठी त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. याला वैतागून गुरुवारी राहत्या घरी परवाना असलेल्या बंदुकीने सुमोहन कनगाल यांनी गोळी झाडून आत्महत्या केली.