महाविकासआघाडी सरकार लढवणार आशिया खंडातील सर्वात मोठी निवडणूक

207

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर सरकारने आशिया खंडातील सर्वात मोठ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक एकत्र लढवण्याचे ठरवले आहे. जिल्हा परिषद, महापालिका या निवडणुकांनंतर आता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी या तीनही पक्षांनी पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर २५ संचालक निवडून येतात. या २५ पैकी १८ संचालकपदासाठी निवडणूक होते, तर ७ संचालक शासन नियुक्त असतात. या निवडणुकीत १८० उमेदवार रिंगणात आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तीन पक्ष एकत्र येताना दिसतायत.