“महाविकासआघाडी सरकारची नाचक्की होत आहे म्हणूनच…”

45

मुंबई, दि.१८ (पीसीबी) : शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपा हा उपऱ्यांचा पक्ष झाल्याची टीका संजय राऊतांनी केली. तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेल्या तपासाचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, उपऱ्यांसंदर्भात राऊतांनी केलेल्या टीकेवर दरेकरांनी थेट आव्हान दिलं आहे.

“महाविकासआघाडी सरकारची नाचक्की होत आहे. त्यामुळे खुद्द शरद पवारांनाही रोज झालेल्या त्याच त्याच विषयांसाठी पत्रकार परिषदा घ्याव्या लागत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा गरळ ओकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अनेक दिवसांच चर्चा करून चोथा झालेल्या ईडी, सीबीआय यंत्रणांच्या गैरवापराची ढोलकी वाजवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा नियोजनबद्ध कार्यक्रम दिसतोय”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

WhatsAppShare