महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग

87

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर उपविभाग संघटकपदी इमरान मिया बेग यांची निवड करण्यात आली आहे.

शुक्रवार (दि. २९) मुंबईतील उध्दवगड याठिकाणी शिवसेना उपनेते तथा महाराष्ट्र शिव वाहतुक सेना अध्यक्ष- हाजी अरफात शेख यांनी इमरान मिया बेग यांना निवडीचे पत्रक देऊन आभिनंदन केले.

यावेळी  महाराष्ट्र शिव वाहतुक सेनेचे सागर लांगे, महाराष्ट्र उपाध्यक्ष लक्ष्मण वाळके, कार्याध्यक्ष शरीफ देशमुख, विनय मोरे, रिजवान बेग, चंद्रकांत तिवारी, कमलेश कर्मरी आदी उपस्थित होते.