महाराष्ट्र विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार

192

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी)- संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेल्या महाराष्ट्र, हरयाणा विधानसभा निवडणुकांची घोषणा अखेर झाली आहे. त्यानुसार महाराष्ट्र आणि हरयाणा दोन्ही विधानसभेसाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. दोन्ही निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

WhatsAppShare