महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल कामगार युनियनच्या शहरप्रमुखपदी नितीन धोत्रे यांची वर्णी

58

पिंपरी,दि.२२ (पीसीबी) : महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट, जनरल कामगार युनियनच्या पिंपरी-चिंचवड विभागप्रमुखपदी भोसरीतील नितीन धोत्रे यांची निवड करण्यात आली. युनियनचे सरचिटणीस, माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी धोत्रे यांना निवडीचे पत्र दिले.

पिंपरी-चिंचवड विभागातील कामगारांना संघटित करुन त्यांना युनियनचे सभासद करावे. युनियनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली कामगारांना न्याय देण्याचे कार्य पिंपरी-चिंचवड विभागप्रमुख या पदावरुन करावे. कामगारांच्या न्याय हक्काच्या विविध प्रश्नांसंदर्भात आपण नेहमी संघटनेच्या वरिष्ठांशी व पुणे येथील माथाडी युनियनच्या कार्यालयाशी संपर्कात रहावे.

माथाडी कामगारांचे आराध्य दैवत स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या संघटनेच्या कोणत्याही ध्येय-धोरणास बाधा येईल, अशी कृती होणार नाही याची दक्षता घ्यावी. पिंपरी-चिंचवड विभागात युनियनची सभासद संख्या वाढवणे, युनियनच्या कार्याची व्याप्ती वाढविण्याचे कार्य आपण करावे, असे पाटील यांनी सांगितले आहे

WhatsAppShare