महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे रुग्णालयात दाखल

52

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती थोडी खालावली असल्याने केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे. तर, घाबरण्याचं कारण नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अमित ठाकरे यांचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आहे. शिवाय, मलेरिया टेस्ट देखील निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दिवसांपासून अमित ठाकरे यांना ताप येत होता, अशी माहिती समोर आली आहे. तर, डॉक्टरांचं म्हणणं आहे की, त्यांना आलेला ताप हा वातावरणातील बदलांमुळे असू शकतो. परंतु, सध्याची करोना परिस्थिती पाहता खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

करोना काळातही अमित ठाकरे यांनी विविध प्रश्नांसाठी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. शिवाय, अनेकांचे प्रश्न त्यांनी राज्य सरकारसमोर मांडले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रव्यवहार देखील केला आहे.

WhatsAppShare