महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी प्रज्ञा पाटीलची निवड 

112

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी सिनेकलाकर प्रज्ञा श्रीमंत पाटील हिची निवड करण्यात आली आहे. त्यांना मनसे नेते अनिल शिदोरे यांनी  निवडीचे पत्र  दिले.

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शशांक नागवेकर, उपाध्यक्ष रमेश परदेशी आदी  उपस्थित होते.  यावेळी  प्रज्ञा  पाटील यांची पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी नियुक्ती करण्यात आली.  तर उपसंघटक म्हणून दत्ता घुले, तुकाराम शिंदे, दीपक भालेराव, शिवनाथ दिल्पाक यांची  नियुक्ती  केली.