महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद पुरस्कार जाहीर

95

 

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्या वतीने 1 मे कामगार दिनानिमित्त पुरस्कार जाहीर झाले आहेत.

कोरोना परिस्थिती निवळल्यावर पुरस्कार वितरण सोहळा श्रीक्षेत्र देहूच्या गाथा मंदिरात होईल. यावेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे ,कामगारमंत्री बच्चू कडू,आदर्श गाव हिवरेचे पोपटराव पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

पुरस्कारार्थी मध्ये राज अहेरराव ( निगडी),अंजली कुलकर्णी ( पुणे), सुभाष चव्हाण ( थेरगाव), मोहन गायकवाड ( चिंचवड), संजय गोळे (वारजे) तसेच कष्टकरी उपेक्षित मजुरांचा सन्मान होणार आहे. यामध्ये शीतल चव्हाण (भोर) स्मशानभूमी मजूर सुनील राम चव्हाण (शवविच्छेदक) औध हॉस्पिटल,महादेव जाधव (पुणे) सफाई मजूर, महादेव खरात ( चर्मकार),नागेश पारसेनवार (वारजे) चहा टपरी मजूर,सरस्वती प्रधान (मोलकरीण), कालिपद सरकार (पिंपरी) बांधकाम मजूर अर्चना कांबळे (निगडी) बांधकाम मजूर,शोभा देशमुख (पिंपळे गुरव) शेत मजूर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले आणि पदमश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे पिंपरी विभाग प्रमुख सुरेश कंक यांनी दिली.

WhatsAppShare