महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे

98

बारामती, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (गुरूवार) येथे दिला.

इंदापूर दौऱ्यावर सुप्रिया सुळे आल्या असून हिंगणगाव येथील एका जाहीर सभेत त्या  बोलत होत्या. यावेळी त्यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला.