महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारच होणार !

517

मुंबई दि. २८, (पीसीबी) – महाविकास अघाडीचे महाराष्ट्र राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे हे निश्चित झाले होते. त्याच नंतर उपमुख्यमंत्री पद कोणाला मिळणार याची उत्सुक्ता संपुर्ण महाराष्ट्राला लागले होते.

राष्ट्रवादीतून बंड करुन भाजपाची तीन दिवसाची सत्ता मिळविणारे अजित पावर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यानी लगेचच या पदाचा राजीनामा देण्यात आला व भाजप सरकारला फक्त तीन दिवसात पाडण्यात आले.

आज (दि. २८) राष्ट्रवादी पक्षाची बैठक पार पडली व उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या नाववर शिक्कामोर्तब करण्यात आले. आज उपमुख्यमंत्री पदासाठीची शपथविधी होणार की नाही हे अजुन स्पष्ट झालेले नाही.

WhatsAppShare