“महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता”

49

मुंबई,दि.२१(पीसीबी) – राम अयोध्येचा राजा होता. या मंदिरासाठी शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडलं. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, असा सवाल शिवसेनेनी सामना अग्रलेखातून भाजपला विचारला. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

लाज सोडली शिवसेनेने. शिवसेनेने आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संज्याचा केला असता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

ज्यांचं घर वर्गणीतून चालतं तेच विचारतायत मंदिर वर्गणीतून बांधणार काय. जनाची नाही पण किमान मनाची तर ठेवा, अशा शब्दात निलेश राणेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

WhatsAppShare