महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. मध्यप्रदेश सरकारने माफी मागावी

89

मुंबई, दि.१३ (पीसीबी) – काँग्रेसच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर गलिच्छ लिखाण चुकीचे, शिदोरी मासिकातील लेखावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केला आहे. काँग्रेस शिदोरी मासिक परत घेऊन माफी मागावी. तसंच सरकारने मासिकावर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याच्या मालिकेचे सत्र सुरुच ठेवले आहे. महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही. मध्यप्रदेश सरकारने माफी मागितली पाहिजे आणि पूर्ण सन्मानाने महाराजांचं पुतळा बसवला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.