महामंडळाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादी सोडली, जयंत पाटलांना योग्य वेळी उत्तर देऊ – नरेंद्र पाटील

1025

सातारा, दि. ७ (पीसीबी) – महामंडळाच्या तुकड्यासाठी राष्ट्रवादी सोडली, अशी टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना योग्यवेळी उत्तर देऊ, असे माजी आमदार आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. जयंत पाटील हे मोठे नेते असून त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे, असेही पाटील म्हणाले.

महामंडळाच्या तुकड्यासाठी नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली, अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती. यावर नरेंद्र पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने असलेल्या महामंडळाला किरकोळ समजले, येथेच त्यांनी  चूक केली आहे. जयंत पाटील यांनी माथाडी कामगारांच्या नेत्यांना किरकोळ समजणे हे चुकीचे आहे. त्यांना मी योग्य वेळी उत्तर देईन, असे नरेंद्र पाटील म्हणाले.