महापालिकेच्या विषय समितींच्या सभापतीसाठी लांडगे, हिंगे, बोबडे, कुटे यांची नावे निश्चित

141

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहर सुधारणा, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक, विधी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदासाठी आज (सोमवार) सत्ताधारी भाजप पक्षातील चार नावे जवळपास निश्चित झाली.

यामध्ये शहर सुधारणा समितीच्या सभापतीसाठी राजेंद्र लांडगे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृती समितीच्या सभापतीसाठी तुषार हिंगे, विधी समितीच्या सभापतीसाठी अश्विनी बोबडे तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी निर्मला कुटे यांची नावे नगरसचिव विभागाला प्राप्त झाली आहेत. विशेषत: या समितींच्या सभापतीसाठी विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकाही उम्मेदवाराने अर्ज दाखल केला नाही. यामुळे शुक्रवारी (दि.१४) या चौघांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होईल. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल कामकाज पाहणार आहेत.