महानायक अमिताभ बच्चन अजूनतरी कोरोना निगेटिव्ह नाही

0
446

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना ११ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यापाठोपाठ अभिषेक बच्चनचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे या दोघांना ११ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी अजूनतरी निगेटिव्ह नाही. एबीपी न्यूजने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

अमिताभ बच्चन यांनी काही वेळापूर्वीच पोस्ट केलेली इंस्टाग्राम पोस्टही चांगलीच चर्चेत आहे. “मजहब तो दो हथेलिया बताती हैं, जुडे तो पूजा और खुले तो दुआ कहलाती है .”अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी केली आहे.