महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसचे अभिवादन

74

थोरसमाज क्रांतीकारक महिला शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पिंपरीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पिंपरी- चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, राजाभाऊ गोलांडे, महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सदस्य संग्राम तावडे, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षा शामला सोनवणे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, मयूर जयस्वाल, विशाल कसबे, तानाजी काटे, प्रविण कुदळे, राजू परदेशी, अर्जुन खंडागळे, विनीता तिवारी, हिरा जाधव, रोनक तावडे, दिपक जाधव, आबा खराडे, संदेश नवले आदी उपस्थित होते.