महात्मा गांधींची हत्या करणारे लोक सत्तेत – स्वरा भास्कर

341

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारे आज सत्तेत बसले आहेत असा आरोप अभिनेत्री स्वरा भास्करने केला आहे. महात्मा गांधींना जेव्हा ठार करण्यात आले तेव्हा सगळा देश शोकसागरात बुडाला होता. तरीही काही लोक असे होते ज्यांनी आनंद व्यक्त केला उत्सव साजरा केला. ते लोक आज सत्तेत आहेत आहेत. त्यांना आपण तुरुंगात टाकणार का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. असे स्वरा भास्करने म्हटले आहे. तिने स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नाही, मात्र तिचा रोख स्पष्टपणे मोदी सरकारकडे आहे यात काहीही शंका नाही.

सद्यस्थितीत समाजात काहीही झाले की तुरुंगात टाका असे म्हटले जाते. रक्तपिपासू समाज होणे ही चांगली बाब नाही असेही स्वराने म्हटले आहे. भिंद्रनवाले यांनाही काही लोक संत म्हणत त्या सगळ्यांनाही उचलून तुरुंगात टाकणार का? असाही प्रश्न स्वरा भास्करने उपस्थित केला आहे. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांसमोर स्वरा भास्करने आपली भूमिका मांडली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.