महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे महिला मोटर सायकल प्रशिक्षक चेतना पंडितची आत्महत्या

116

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – प्रसिद्ध बाइक रेसर आणि महिला मोटर सायकल प्रशिक्षक चेतना पंडित हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवार (दि.१०) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय चेतना पंडित गोरेगाव पूर्वेला तीन मैत्रिणींसह भाड्याने राहत होती. मंगळवार दुपारपासून तिच्या घराचा दरवाजा बंद होता. खूप वेळ दरवाजा बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. संध्याकाळी शेजारी दार तोडून आत गेले असता त्यांना चेतना मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच दिंडोशी पोलिसांना घटना स्थळी एक सुसाईड नोट सापडली त्यामध्ये ‘माझ्या महत्त्वाकांक्षा पू्र्ण करता न आल्यामुळे मी आत्महत्या करते आहे,’ असे लिहिले आहे.