मशीन २०१९; उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी, बसपा आणि राष्ट्रीय लोक दलाची आघाडी ?

86

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे.  उत्तर प्रदेशात काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा आणि राष्ट्रीय लोक दल (रालोद) या पक्षांनी आघाडी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चारही पक्षांमध्ये जागावाटपावर एकमत झाले आहे. सर्वाधिक ४० जागा बसपाला देण्यात आल्या आहेत. तर काँग्रेस ८ जागा लढवणार आहे.   सपाच्या कोट्यातून रालोदला जागा देण्याचे सपाने मान्य केल्याचे सांगितले जात आहे.